Crime – झोमॅटो आणि स्विगीच्या 3 डिलिव्हरी बॉयने उघडला साईड बिझनेस! पार्सल डिलिव्हरी करताना चोरी करायचे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, हडपसर पोलिसांनी तिघांना जेरबंद करून 1 लाख 97 हजारांचा मुद्देमाल केला जप्त



|सहकारनामा|

पुणे : दिनांक २३/०६/२०२१ झोमॅटो व स्वीगी कंपनीची पार्सल डिलेव्हरी करताना उच्चभ्रु सोसायटीमधील तसेच रस्त्यावरील येणा-या जाणा-या जेष्ठ महिलांवर पाळत ठेवुन त्यांचे मंगळसुत्र खेचुन जबरी चोरीचे गुन्हे करणा-या झोमॅटो व स्वीगी कंपनीच्या कामगारांना हडपसर पोलीसांनी अटक करुन त्यांचेकडुन १,९७,०००/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त केला आहे.

हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक- १६/०६/२०२१ रोजी दुपारी १३/१० वा चे सुमारास फिर्यादी भारती विठ्ठल भाडळे (वय ६० वर्षे धंदा गृहिणी रा. ऊरळी देवाची साने गुरुजी मार्ग ता.हवेली जि.पुणे) हे निर्मल टाऊनशिप, काळेपडळ हडपसर पुणे. यांचे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र दोन इसमांनी जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेलेबाबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ४४३/२०२१ भादंविक ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्हा हा भरदिवसा हा दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी घडलेला असल्याने तसेच आरोपींनी योगीराज सोसायटीचे आत प्रवेश केला असताना त्याच्या पाठीमागून येवून गळ्यातील चैन जबरदस्तीने ओढून नेली असल्याने, दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून तात्काळ मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर भागातील सर्व सी.सी.टी.व्ही फुटेज पडताळणी केली असता, अनोळखी ३ आरोपी यांनी फिर्यादी महिलेचा पाठलाग निर्मल टाऊनशिप, काळेपडळ हडपसर पुणे ते योगीराज सोसायटी या दरम्यान त्यांचेवर पाळत ठेवून त्यांचा पाठलाग करून केला असल्याचे निष्पन्न झाले. 

आरोपींनी त्यांचे गाडीस झोमॅटो डिलव्हरी बॅग लावलेली दिसली. त्याच्याआधारे नमुद आरोपींचा सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे शोध घेत सुमारे ५०० हून अधिक रोड लगत असलेल्या दुकानाचे व रोडचे बाजुचे कॅमेरे यांच्या आधारे शोध घेत असताना गुन्हा केलेले आरोपी हे त्याचेकडील मोटर सायकलवरुन चंदनननगर, खराडी पर्यंत गेले असल्याचे असल्याचे निष्पन्न झाले.

दिनांक २१/०६/२०२१ रोजी तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रशांत दुधाळ व निखील पवार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीचे आधारे सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने, पोलीस अंमलदार प्रताप गायकवाड, प्रदीप सोनवणे, शाहीद शेख, अकबर शेख , समीर पांडुळे, शशिकांत नाळे, प्रशांत टोणपे यांनी शेवाळवाडी भागात सापळा रचून आरोपी नामे १) आकाश सिध्दलिंग जाधव (वय २३ वर्षे धंदा झोमेटो डिलेव्हरी बॉय रा. जहागीरनगर, साज कंपनीसमोर,शिंदेवस्ती हडपसर पुणे. मुळगावलेन नंबर-५, कावळा गल्ली सेंटलमेंन्ट सोलापुर) २) विजय जगन्नाथ पोसा (वय २२ वर्षे धंदा स्वीगी डिलेव्हरी बॉय रा. लेन नंबर- ४, तुळजाभवानीनगर खराडी पुणे) ३) साहिल अनिल गायकवाड (वय २२ वर्षे धंदा जिम हाऊसकिपर, अॅक्टीवेट जीम सोलापुर रा. मु.पो. सावरखेड, जय हनुमान तरुण मंडळाजवळ, ता.सोलापुर जि.सोलापुर) यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास केला असता, आरोपी आकाश जाधव याने सांगितले की, दिनांक- १६/०६/२०२१ रोजी दुपारी मी व माझे दोन साथीदार असे तिघेजण एच.एफ.डिलक्स मोटर सायकलवरुन झोमेटोची डिलेव्हरी देण्यासाठी निर्मल टाऊनशिपमध्ये गेलो होतो. डिलेव्हरी देवुन बाहेर आलो तेंव्हा सदर सोसायटी मधून एक महिला बाहेर आली. त्यांच्या पाठोपाठ जावुन त्याच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने ओढून दुचाकी गाडीवर निघून गेलो असल्याचे सांगीतले. तसेच दाखल गुन्हा केल्यानंतर आत्मविश्वास वाढल्याने त्यांनी दिनांक १९/०६/२०२१ रोजी अशाच प्रकारे चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुपारच्या वेळेस महिलेच्या गळ्यातील जबरस्तीने मंगळसुत्र चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तीन्ही आरोपींना अटक करण्यात आली असुन दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा.श्री.नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा. नम्रता पाटील, पोलीस उपआयुक्त,परिमंडळ ५ पुणे शहर, यांचे सुचना व मागदर्शनाखाली मा.श्री. कल्याणराव विधाते, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. राजु अडागळे, पोनि.(गुन्हे) श्री. दिगबर शिंदे पोनि (गुन्हे) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षिरसागर, पोलीस नाईक अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, पोलीस शिपाई शाहीद शेख, अकबर शेख, शशिकांत नाळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.