Categories: Previos News

कराडजवळ पुण्यातील युवकांचा अपघात, 3 ठार तर 8 जण गंभीर



सातारा/पुणे – सहकारनामा

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आटके टप्पा परिसरात इनोव्हा कार व स्विफ्ट कारचा रविवार दि.31 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात होऊन या अपघाता मध्ये 3 जण जागीच ठार झाले तर 7 ते 8 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

हा अपघात इनोव्हा कार व स्विफ्ट कारमध्ये घडला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातातील सर्वजण पुणे येथील रहिवासी असून राहुल दोरगे (वय २८), स्वप्निल शिंदे (वय २८), बाळासाहेब कांबळे (सर्व रा. कात्रज, पुणे) अशी या अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर गणेश काळे (वय २८), बाळासाहेब गदळे (वय ३१), तुषार गावडे यांच्यासह अन्य पाच ते सहाजण जखमी झालेले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर कोल्हापूर बाजूकडुन पुणे बाजूकडे इनोव्हा कार व स्वीफ्ट कार निघाल्या होत्या. त्या दोन्ही कार कराड तालुक्याच्या नारायणवाडी गावच्या हद्दीत आल्यानंतर एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अटकेटप्पा येथे त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही कार रस्त्याच्या बाजूल असलेल्या झाडावर जाऊन आदळल्या. अपघात झाल्याची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह हायवे हेल्पलाईनचे कर्मचारी त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. 

तसेच तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने अपघातातील जखमींना उपचारासाठी त्वरीत कराड येथील रुग्णालयात पाठविले. अपघात स्थळी दोन्ही गाड्यांच्या काचा पडल्या होत्या. तर मोठ्या प्रमाणावर वाहनांचे नुकसान झाले होते. जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

13 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago