पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, 3 वर्षांची मुलगी, 6 वर्षाच्या मुलाचा समावेश



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

पुणे शहरामध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात घडली असून एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन चिमुकल्यांना गळफास दिल्यानंतर आई-वडिलांनी गळफास लावून आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिस व्यक्त करत आहेत.

अतुल दत्तात्रय शिंदे (वय 33), जया अतुल शिंदे (वय 32), ऋग्वेद अतुल शिंदे (वय 6) आणि अंतरा अतुल शिंदे (वय 3) अशी आत्महत्या केलेल्याची नावे आहेत.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.