|सहकारनामा|
दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे असणाऱ्या हंडाळवाडी (म्हसोबा) चौकात पाहुणे म्हणून आलेल्या 3 महिला आणि पुरुषाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मुलीला दिल्या जाणाऱ्या त्रासाचा राग मनात धरून हि मारहाण करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत नंदकुमार झुंबर इजगुडे (व्यवसाय शेती राहणार पांडेश्वर तालुका पुरंदर जिल्हा पुणे) यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली आहे.
यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दत्तात्रेय रामभाऊ टेंगले, बाळासाहेब नामदेव टेंगले, बाळू टेंगले यांचा मुलगा सोन्या बाळू टेंगले, तानाजी रामभाऊ टेंगले, रामचंद्र नामदेव टेंगले (सर्व राहणार केडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि घटना दिनांक 26/8/2021 रोजी 1:40 वा चे सुमारास केडगाव हंडाळवाडी म्हसोबा चौक येथे दादा पोपट सुळ यांच्या घरासमोर घडली आहे.
फिर्यादी हे त्यांचे मेव्हणे दादा पोपट सुळ यांना भेटण्यासाठी त्यांच्या कुटुंबासह केडगाव (हंडाळवाडी, म्हसोबा चौक) तालुका दौंड येथे गेले असता यातील आरोपी रामचंद्र टेंगले यांची मुलगी कविता आबूदेव इजगुडे हिला दिलेल्या त्रासाचा राग मनात धरून यातील आरोपी मजकूर यांनी फिर्यादी, फिर्यादीची पत्नी सारिका, मेहुणी व सासू यांना बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ दमदाटी करून काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच आरोपी नंबर 3 याने फिर्यादी यांची मेहुणी हिस चामडी पट्ट्याने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हा गुन्हा घडल्यानंतर यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.अधिक तपास अंमलदार पो ना कापरे हे करीत आहेत.