दौंड : सहकारनामा
दौंड तालुक्यातील केडगाव बाजारपेठ हि तालुक्यातील अग्रगण्य बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मार्च 2020 साली कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन चा आदेश आल्यानंतर नंतर वर्षी हि बाजारपेठ आणि संपूर्ण केडगाव जवळपास सहा ते सात महिने बंद होते.
काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने केडगाव आणि केडगावची बाजारपेठ पुन्हा एकदा जोमाने सुरू झाली आहे, मात्र आता पुन्हा केडगाव आणि परिसरामध्ये कोरोनाने डोके वर काढल्यानंतर आता येथे काही कडक निर्बंध लावण्या व्यतिरिक्त ग्रामपंचायतीकडे पर्याय उरला नाही त्यामुळे येत्या 28 मार्चपासून रविवार, सोमवार आणि मंगळवारी असे 3 दिवस संपूर्ण केडगाव बंद ठेवण्याचा निर्णय केडगाव ग्रामपंचायतीने घेतला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव या भागात वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाला काही नागरिकांनी मात्र विरोध दर्शविला आहे, त्यांच्या मते गाव बंद ठेवणे हा उपाय नसून यासाठी नागरिकांनी कोविड 19 चे शासनाने घालून दिलेले नियम पाळणे गरजेचे आहे.
गाव बंद ठेवण्याबाबत केडगाव ग्रामपंचायतीचा निर्णय झाला असून येत्या 28, 29 आणि 30 मार्चला संपूर्ण केडगाव बंद राहील अशा आशयाचे पत्र केडगाव ग्रामपंचायतीने प्रसिद्ध केले आहे.