Categories: Previos News

दौंड करांनो पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करा – निर्मला राशिनकर. या 2 दिवशी शहरातील पाणीपुरवठा बंद



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

दौंड नगरपालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनी तील पाणी गळती काढण्याचे काम त्वरित करावयाचे असल्याने शहरातील होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे, त्यामुळे नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करून नगर पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांनी दौंड करांना केले आहे.

नगरपालिकेचा पाणी साठवण तलाव ते जलशुद्धीकरण केंद्र व जलशुद्धीकरण केंद्र ते मुख्य साठवण टाकी पर्यंत पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीस विविध ठिकाणी गळती होत असल्याने गळती काढणे कामी गुरुवार दिनांक 18 फेब्रु दुपारपासून होणाऱ्या भागास व दिनांक 19 व 20 फेब्रु.रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.



तसेच दिनांक 21 फेब्रु. दुपारपासून होणारा पाणीपुरवठा उशिराने व कमी दाबाने होणार आहे त्यामुळे नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन नगर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुतांशी नगरसेवकांनी शहरातील पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करून नागरिकांच्या पाणी प्रश्नांबाबत च्या समस्या सोडविण्याबाबत मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी  केलेली होती.

शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकर निकाली काढला नाही तर लोक आम्हाला रस्त्यावरून फिरू देणार नाही अशी व्यथा ही नगरसेवकांनी सभेत मांडली होती त्यामुळे नगरपालिकेने तातडीने सदरचे काम हाती घेतले असल्याचे दिसते आहे.

Sahkarnama

Recent Posts

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण, सहाय्यक रेल्वे चालकाविरोधात दौंडमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण, सहाय्यक रेल्वे चालकाविरोधात दौंडमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल

2 तास ago

श्री विठ्ठल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी ‘संतोष देशमुख’ तर व्हा.चेअरमनपदी ‘प्रविण मोरे’ यांची बिनविरोध निवड

श्री विठ्ठल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी ‘संतोष देशमुख’ तर व्हा.चेअरमनपदी ‘प्रविण मोरे’

8 तास ago

भीमा पाटस कारखान्याची ‘सत्य’ परिस्थिती आली समोर | आरोप करणारे निरुत्तर.. आ.‘राहुल कुल’ यांच्या ‘त्या’ कृतीची सर्वत्र चर्चा

भीमा पाटस कारखान्याची सत्य परिस्थिती आली समोर | आरोप करणारे निरुत्तर.. ‘राहुल कुल’ यांच्या ‘त्या’…

2 दिवस ago

दौंड मध्ये पहिल्यांदाच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

दौंड मध्ये पहिल्यांदाच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

2 दिवस ago

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे – बाळासाहेब लाटकर

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे - बाळासाहेब…

3 दिवस ago