क्राईम

किरकोळ कारणावरून महिलेवर स्क्रुड्रायव्हर ने ‛वार’, तरुणावर गुन्हा दाखल

दौंड :
दौंड तालुक्यातील खामगाव येथे एका तरुणाने महिलेवर स्क्रुड्रायव्हर ने हल्ला करून तिला जबर जखमी केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खामगाव फाटा-गाडामोडी रस्त्यावर सुरेश रूपाजी राजवडे यांच्या पत्र्याच्या शेडसमोर आरोपी तुषार रामचंद्र ननवरे (सध्या.रा. कासुर्डी ता.दौंड, मुळगाव वीर ता.पुरंदर) हा इसम फिर्यादी मनिषा संतोष सूर्यवंशी ( गृहिणी, सध्या. रा. कासुर्डी, ता.दौंड, मुळगाव कोरेगाव, सातारा) यांच्यासमोर येऊन बडबड करत असताना त्यांनी तुषार ननवरे यास तु दारू पिवुन आला काय, तु विनाकारण बडबड का करतो असे म्हटल्याने आरोपीने त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि आपल्याकडील पिवळ्या रंगाच्या स्क्रुड्रायव्हरने फिर्यादी मनिषा सूर्यवंशी यांच्या पोटात, डावे बाजुचे बरगडीवर, पाठीत आणि उजव्या पायाच्या मांडीवर वार करून त्यांना जबर जखमी केले आहे.
हा सर्व प्रकार घडल्यानंतर फिर्यादी यांनी यवत पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरून आरोपी तुषार ननवरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

4 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

17 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

19 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

21 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago