Categories: Previos News

कुख्यात ज्वालासिंग टोळीतील दोघेजण यवत आणि उरुळीकांचन येथून जेरबंद ! 29 वर्षापासून होते फरारी, पुणे ग्रामीणच्या LCB पथकाची कामगिरी



पुणे : सहकारनामा ऑनलाइन

कोल्हापूर येथील २२ वर्षांपूर्वीच्या दरोड्यातील ज्वालासिंग टोळीच्या दोन फरार आरोपींना जेरबंद करण्यात पुणे ग्रामिण LCB ला यश आले असून ही कारवाई उरुळीकांचन ( ता.हवेली) येथे गुन्हे अन्वेषण पथकाने केली आहे. 

याबाबत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहिती नुसार काळ्या उर्फ दामू बरोट्या नानावत उर्फ कंजारभट (वय ५९ रा.यवत इंदिरानगर ता.दौंड जि.पुणे) व अरविंद उर्फ सेनीर रामलाल राजपूत  उर्फ कंजारभट (वय ५८ रा.दत्तवाडी उरुळीकांचन ता.हवेली जि.पुणे) या दोन अट्टल दरोडेखोरांना दरोड्याच्या गुन्ह्याखाली ताब्यात घेण्यात आले आहे.

पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांचे आदेशाने गुन्हे शाखेकडून रेकॉर्डवरील पाहिजे असलेला  फरारी आरोपी पकडणेकामी विशेष मोहिम राबवित असताना आज  दिनांक ०२/१०/२०२० रोजी पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे टिमला मुरगुड पोलीस स्टेशन जिल्हा कोल्हापूर येथे २९ वर्षापूर्वी दाखल असलेल्या दरोडयाच्या दोन गुन्हयातील रेकॉर्डवरील पाहिजे असलेले फरारी आरोपी नामे १) काळ्या उर्फ दामू बरोट्या नानावत उर्फ कंजारभट वय ५९ रा.यवत इंदिरानगर ता.दौंड जि.पुणे २)अरविंद उर्फ सेनीर रामलाल राजपूत  उर्फ कंजारभट वय ५८ रा.दत्तवाडी उरुळीकांचन ता.हवेली जि.पुणे हे दोघे उरूळीकांचन यवत परिसरात राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकास मिळाली. 

त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने त्या भागात वेषांतर करून फरारी आरोपींची माहिती काढली असता ते नावे बदलून तेथे राहत असल्याची माहिती मिळाली. आज रोजी ते उरुळीकांचन येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी सापळा रचून ताब्यात घेण्यात आलेले आहे. 

सदर आरोपीस पुढील चौकशीकामी मुरगुड पोलीस स्टेशन जिल्हा कोल्हापूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली  पोहवा. महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरू गायकवाड, विदयाधर  निचित, प्रमोद नवले यांनी केलेली आहे.

आंतरराज्य रेकॉर्डवरील गुन्हेगार ज्वालासिंग टोळीचा म्होरक्या ज्वालासिंग कंजारभाट हा आंतरराज्य रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्रासह परराज्यात खुनासह दरोडा , जबरी चोरी असे सुमारे १५० पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते. 

त्या काळात त्याच्या टोळीने लूटमारीचा सपाटाच लावलेला होता. ते गुन्हे केल्यानंतर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात फरार व्हायचे. त्यामुळे मिळून येत नसल्याने पोलिसही हैराण झाले होते. पोलिस एन्काउंटर करतील या भीतीने ज्वालासिंग १९९९ मध्ये पोलिसांना शरण आला होता. सध्या तो शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या गुन्ह्यात येरवडा तुरुंगात आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

1 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

18 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 दिवस ago