‘दोन प्रकरणांत’ केडगाव येथील 2 शेतकऱ्यांची 28 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक! चौघांवर गुन्हा दाखल

दौंड : केडगाव (ता.दौंड) येथील 2 शेतकऱ्यांची विविध दोन प्रकरणांमध्ये सुमारे 28 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ऋषिकेश गणपत शेळके आणि हनुमंत रघुनाथ थोरात या दोन शेतकऱ्यांनी फिर्याद दिली दिल्याने यवत पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या प्रकारामध्ये ऋषिकेश गणपत शेळके (केडगांव, पाटील निंबाळकरस्ती ता.
दौंड, जि. पुणे) यांना ऊसतोड मजूर पुरवतो असे सांगून सुरेश बाजीराव भोईटे (रा.रोकडे ता.चाळीसगाव) व त्याचा मामा विजयकुमार कुंडलिक पवार (रा.खोपोडी ता.दौंड ) या दोघांनी ऋषिकेश शेळके यांच्याकडून एकदा 3 लाख व नंतर 12 लाख अशी एकूण 15 लाख रुपये अशी मोठी रक्कम घेऊन त्यांना उसतोड मजुर न देता त्यांच्या पैशाचा अपहार करत त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून वरील दोन इसमांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या प्रकारामध्ये हनुमंत रघुनाथ थोरात (रा.केडगाव स्टेशन, डॉ.थोरात हॉस्पिटल, ता.दौंड) या शेतकऱ्याचे उस उत्पादन करणारे गुऱ्हाळ अनुमल मित्तल व त्याचा मुलगा अनुकूल अनुमल मित्तल (रा. महम्मदवाडी, पुणे) या दोघांनी भाड्याने चालवायला घेतले होते. यावेळी गुऱ्हाळासाठी लागणारा उस हनुमंत थोरात यांकडून घेण्यात आला होता त्याचे पैसे व गुऱ्हाळाचे भाडे असे 13 लाख 75 हजार रुपये हनुमंत थोरात यांना देण्यात आले नाही. त्या बदल्यात त्यांना देण्यात आलेले तीन चेकहि बाउंस करण्यात आले त्यामुळे आपली फसवणूक करण्यात आल्याची खात्री फिर्यादीला झाली. त्यामुळे आपली 13 लाख 75 हजारांची फसवणूक करण्यात आल्याची फिर्याद हनुमंत थोरात यांनी यवत पोलीस ठाण्यात दिल्याने यवत पोलीस ठाण्यात वरील दोन इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.