अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यसरकारचे 10 हजार कोटींचे अर्थ सहाय्य, मंत्रीमंडळ बैठकीत अजून ‛हे’ पाच निर्णय घेण्यात आले

मुंबई :
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी झाली त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झालं. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्यसरकारच्या वतीने १० हजार कोटींचे अर्थसहाय्य आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या बळीराजाला आता आधार मिळणार आहे.
वरील निर्णयाबरोबरच आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले ज्यामध्ये..
● पदोन्नती आरक्षण कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाकडून बाजू मांडण्यात येईल.
● सहकारी संस्थांचे सदस्य नियमित समजण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्यात येईल.
● कोरोना पार्श्वभूमीवर कलाकार व संस्थांना अर्थसहाय्य देण्यात येईल.
● अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी 10 हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल.
● बिगर नेट तसेच सेट अध्यापकांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळेल.
आणि
● केंद्राची मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक कृती योजना राज्यात राबविण्यात येईल असे महत्वाचे निर्णय आज घेण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या 17 व्या बैठकीत राज्य वन्यजीव कृती आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात 78.89 वर्ग कि.मीच्या विस्तारीकरणाचाही निर्णय घेण्यात आला आहे.