पुणे

रुग्णाच्या मृत्यूनंतरही उपचारासाठी औषध खरेदीचे बिल दाखविणाऱ्या औषध विक्रेत्याचा परवाना 30 दिवसांसाठी निलंबित

अख्तर काझी 

दौंड : 

रुग्णाच्या निधनानंतर त्याच रुग्णाच्या उपचारासाठी औषध खरेदी केल्याचे बिल दाखविणाऱ्या येथील खाजगी दवाखान्यातील सद्गुरु मेडिकल्स या पेढीचा परवाना राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहा. आयुक्त एस. व्ही. प्रतापवार यांनी 30 दिवसासाठी निलंबित केला आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्या अंतर्गत नियम 1945 अन्वये सदरची कारवाई करण्यात आली आहे. दौंड उपजिल्हा रुग्णालय, आरोग्य सल्लागार समिती सदस्य तथा नगरसेविका ज्योती अजय राऊत यांनी याप्रकरणी संबंधित विभागाकडे तक्रार केली होती.
रुग्णाचे निधन होऊन १६ दिवसांनंतर त्याच रुग्णाच्या उपचारासाठी औषधे खरेदी केल्याचे मेडिकल बिल देणाऱ्या मेडिकल तसेच रुग्णालयावर कायदेशिर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दौंड नगरपरिषदेच्या नगरसेविका ज्योती अजय राऊत यांनी केली होती. याबाबतचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक आरोग्य चिकित्सालय (औंध, पुणे) यांच्याकडे देण्यात आले होते. याबाबत अधिक माहिती अशी की, कैलास कृष्णा गिरमे (वय ५८ रा. गिरमेवस्ती कुरकुंभ ता.दौंड) हे दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल (गट क्र. 5) येथे सहाय्यक फौजदार पदावर कार्यरत होते. कैलास गिरमे यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना २३ ऑगस्ट २०२०रोजी दौंडच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान ते कोरोना पाॅझीटीव्ह असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू केले गेले. त्यासाठी लागणारे औषधे याच रूग्णालयातील सदगुरू मेडिकल येथूनच खरेदी करण्यात आले. उपचारानंतर २८ ऑगस्ट २०२० ला गिरमे यांना घरी सोडण्यात आले. मात्र, पुन्हा काही दिवसांनी त्रास होऊ लागल्याने ३१ ऑगस्ट २०२० याच रूग्णालयात दाखल केले.

पुन्हा त्याच मेडिकल मधून औषधे घेतली. उपचार सुरू असताना ३ सप्टेंबर २०२० पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास गिरमे याचे निधन झाले होते. दरम्यान उपचारासाठी लागलेले औषधे तसेच रुग्णालयाचे बिल अदा केल्याने रूग्णालयाने कैलास गिरमे याचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात दिला. त्यानंतर राहत्या गावी नातेवाईकाच्या उपस्थितीत गिरमे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कैलास गिरमे हे शासकीय सेवेत कार्यरत होते. त्यामुळे त्यांना वैद्यकीय बिलाची रक्कम शासनाकडून मंजूर होऊन पुन्हा मिळते. या प्रक्रियेत रूग्णालय आणि मेडिकल यांची बिले महत्वाची होती. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून रूग्णालय व मेडिकल यांच्या सही व शिक्का असलेली बिले (फाईल) देण्यात आली.

मात्र, गिरमे याच्या निधनानंतर १६ दिवसांनी त्याच्या उपचारासाठी १७ सप्टेंबर २०२० औषधे खरेदी केल्याचे या बिलावर दर्शविण्यात आले होते. या प्रकारामुळे मयत गिरमे यांच्या कुटुंबीयाना शासकीय वैद्यकीय बिलाची रक्कम पुन्हा कशी मिळेल असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे रूग्णालय आणि येथील मेडिकल यांच्याविरुद्ध कायदेशिर कारवाई करावी, तसेच गिरमे यांना रितसर बील मिळावे असे आदेश या रूग्णालय व मेडिकल यांना देण्यात यावे असे निवेदनात नमूद करण्यात आले होते.

दौंड मधील औषध विक्रेत्यावर पहिल्यांदाच अशी कारवाई झाल्याने औषध विक्रेत्यांमध्ये चर्चेला ऊत आला आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

10 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

23 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago