दौंड : दौंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान नगरसेवक,मा. उप. नगराध्यक्ष राजेश शामराव जाधव यांच्या विरोधात एका महिलेने विनयभंग केल्याप्रकरणी दौंड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. राजेश जाधव (रा. गोवा गल्ली, दौंड) यांच्या विरोधात खाजगी सावकारीचा ही गुन्हा दाखल झाल्याने येथील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी महिलेला राजेश जाधव यांनी डिसेंबर 2019 रोजी दोन लाख रुपये महिना 8% टक्के व्याजाने दिलेले होते. फिर्यादीस व्याजाचे पैसे देणे शक्य न झाल्यामुळे राजेश जाधव यांनी फिर्यादीच्या बहिणीच्या घरामध्ये फिर्यादीस अश्लील भाषेत दमबाजी केली. तुला नागडी करून दौंड मध्ये फिरवीन, मी पैसे कसे वसूल करतो हे साऱ्या दौंडला माहित आहे. अशी भाषा वापरून, तुला जर माझे पैसे देता येत नसतील तर मला वेळ दे म्हणत जाधव यांनी फिर्यादी महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली व तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
दौंड पोलिसांनी राजेश जाधव विरोधात महिलेचा विनयभंग करणे तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39,45 (अ) (क) अन्वय गुन्हा दाखल केला आहे.