बापरे.. ‛केडगाव, यवत, राहू, वरवंड, पाटस’ सह या ‛27’ गावांत ‛आज’ 96 कोरोना पॉझिटिव्ह



– सहकारनामा

दौंड : 

दौंड तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. आता दररोज शेकडोंनी कोरोना बाधित रुग्ण सापडत असून त्यातील अनेकजण उपचारानंतर बरे होऊनही जात आहेत.

यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शशिकांत इरवाडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार यवत ग्रामिण रुग्णालयाकडून दि. 6/04/2021 रोजी 226 स्वॅब पाठविण्यात आले होते. त्याचा आज दि.8 एप्रिल रोजी अहवाल आला असून या 226 स्वॅब पैकी 96 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तर 130 जण निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 69 पुरुष आणि 27 महिलांचा समावेश आहे.

यवत -15, पाटस -7,

वरवंड -3, पिंपळगाव -3, राहू -8, नानगाव -2, कासुर्डी – 1, माळशिरस -3, कानगाव -5, केडगाव -14, आंबेगाव – 1, दौंड -1,

 खोर – 2, भांडगाव -4,

 खामगाव – 2, दापोडी, -2, बोरीऐंदी 2, खुटबाव -3, पारगाव – 2, सुपा – 2, देऊळगांव गाडा – 1, कडेठाण, – 2, बोरीभडक – 2, सहजपूर -2, नांदूर -2, देलवडी – 1,  नांदूर -2 अशी गावनिहाय आकडेवारी समोर आली आहे.

सध्या केडगाव आणि यवत मध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडत असून यवत, केडगाव खालोखाल राहू आणि पाटसमध्ये रुग्ण बाधित होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.