Categories: क्राईम

दौंड तालुक्यात 26 जानेवारीचा दिवस हाणामाऱ्यांनी गाजला, कुठे बंदुकीतून ‘गोळीबार’ तर कुठे तलवारी ‘वार’

दौंड : 26 जानेवारी हा देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तमाम देश बांधव एकदुसऱ्यांना शुभेच्छा देऊन सुट्टी निमित्त एकदुसऱ्याकडे जाऊन भेटीगाठी घेत असतात. मात्र या इतक्या महत्वाच्या दिवशीही दौंड तालुक्यात अनेक ठिकाणी मारहानीच्या घटना घडल्या. काही ठिकाणी बंदुकीतून गोळीबार करण्यात आला तर काही ठिकाणी तलवारीने वार कारण्यात आले.

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 26/01/2024 रोजी सकाळी 10ः30 च्या सुमारास यातील फिर्यादी राजेंद्र दशरथ गवळी हे कानगाव गावची ग्रामसभा असल्याने विठ्ठल मंदिरात हजर असताना ज्ञानेश्वर उर्फ माउली आपासो शेळके हे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मोहन मिसाळ यांना माझा अर्ज घ्या असे बोलले तेव्हा फिर्यादीने अर्ज देण्यासाठी सात दिवसांची मुदत असते ती मुदत संपुण गेली आहे तरी तुम्ही अर्ज स्विकारू नका असे ग्रामसेवक याना बोलले. याचा राग येवून ज्ञानेश्वर शेळके यांनी त्यांचे मेहूने वैभव संजय निगडे, अक्षय संजय निगडे व ओंकार राजेंद्र निगडे यांच्यासह मिळून फिर्यादीवर तलवार वार आणि दगडांनी हल्ला केल्याचे फिर्यादित म्हटले म्हटले आहे.

याबाबत ज्ञानेश्वर उर्फ माउली अप्पासो शेळके, अक्षय संजय निगडे, वैभव संजय निगडे, ओंकार राजेंद्र निगडे, आप्पासाहेब सदाशीव काळे, दिगंबर आप्पासो काळे (सर्व रा. कानगाव ता.दौंड जि.पुणे) यांच्यावर यवत पोलीस ठाण्यात भा.दं.वि.का.क 307, 143, 147, 148, 149, आर्म अ‍ॅक्ट कलम 4, 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

गार फाटा येथे मारहाण आणि बंदुकीतून गोळीबार करण्याची घटना

दुसरी घटना 26 जानेवारी रोजी सायकांळी 5ः00 वाजता पाटस (गारफाटा) येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि अनिकेत विजय भागवत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी धैर्यशील जाधवराव, दिगविजय जाधवराव, अभिजित जाधवराव, वीरसिंह जाधवराव, समीर जाधवराव (सर्व रा.पाटस गारफाटा ता.दौंड जि.पुणे) आसिफ शेख नामक व्यक्ती, 01 अज्ञात अंगरक्षक आणि 30 ते 40 महिला यांनी बेकायदा जमाव जमवुन फिर्यादीला हॉकी स्टीक, लाकडी दांडके, लाथा बुक्यांनी मारहाण केली व तेथे पडलेली विट डोक्यात फेकुन मारली. विरसिंह उर्फ (पिपु) जाधवराव याने त्यांच्याकडील बंदुकीचा धाक दाखवुन हवेत गोळीबार केला तसेच चुलती सौ.वंदना, आजी शंकुतला यांना धक्काबुक्की केली व त्यांनतर अज्ञात 30 ते 40 महिला आल्या आणि त्यांनी चुलती सौ.वंदना यांना धक्काबुक्की केली असे फिर्यादित म्हटले आहे.

तर विरसिंह चंद्रशेखर जाधवराव, (वय – ३५ वर्षे, शेती, रा. गार फाटा, पाटस) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी अभिजीत राजु भागवत, अनिकेत विजय भागवत, कोमल दिगविजय भागवत, सौ.गौरी अभिजित भागवत, शकुंतला सोनबा भागवत, वंदना संजय भागवत, सौ.सोनाली अनिकेत भागवत, मालन अशोक भागवत, सौ.ललिता राजु भागवत, दिग्विजय राजु भागवत (सर्व रा.पाटस गारफाटा ता.दौंड जि.पुणे) यांना 26/01/2024 रोजी वेळ सायकांळी 5ः30 च्या सुमारास मी म्हणालो की, तुम्हांला 05 गुंठे जागा आम्ही प्रेमापोठी राहण्यास दिली आहे. तुम्ही कशाला जास्त जागा वापरता असे म्हणताच त्यांनी बेकायदा मंडळी जमवुन मला तसेच भाउ धैर्यशील दिपक जाधवराव यास शिवीगाळ दमदाटी करुन हाताने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच अभिजित राजु भागवत याने त्याच्या हातामधील काठीने डाव्या हाताच्या पोटरीवर मारली तसेच भाउ दिग्विजय दिपक जाधवराव याच्या पाठीवर मारहाण केली असे म्हटले आहे. दोन्ही बाजूच्या लोकांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

13 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago