पुरंदर :
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्यांचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीना दिलीप निरगुडे (वय 62, रा. लांडगेआळी सासवड ता.पुरंदर, पुणे) या वृद्धा सायंकाळी 07:25 वाजता सासवड येथील चव्हाण कॉर्नर, दळवी बिल्डिंग समोरून पायी घरी जात असताना एका अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील पाच तोळ्यांचे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरून नेले. हा प्रकार घडल्यानंतर मीना निरगुडे यांनी पोलीस ठाण्यात येऊन घडलेल्या प्रकाराची फिर्याद दिली असून पुढील तपास पोसई झिंझुर्के हे करीत आहेत.