| सहकारनामा |
दौंड : दौंड तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना त्यांचा रिकव्हरी रेट (बरे होण्याचे प्रमाण) हि 90% झाल्याने तालुक्यात समाधान व्यक्त असताना आता दौंड शहर आणि परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या घटत असल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांच्याकडून प्राप्त अहवालातून समोर आली आहे.
आज दौंड उपजिल्हा रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार एकूण 262 जणांचे नमुने तपासण्यात आले त्यामध्ये 52 जण पॉझिटिव्ह आले तर 210 जण निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रुग्णांची सरासरी पाहता एकूण रुग्णांपैकी आजची टक्केवारी हि 20% एवढी आली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 30 पुरुष आणि 22 महिलांचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची घटत असलेली आकडेवारी हि तालुक्याच्या दृष्टीने एक समाधानकारक बाब मानली जात आहे.