26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबचा ‛तो’ फोन परमबीर सिंग यांनी तपासात का घेतला नाही? सेवानिवृत्त ACP चा गंभीर आरोप

मुंबई : निवृत्त एसीपी शमशेर के पठाण यांनी जुलै 2021 मध्ये मुंबई पोलिस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात आरोप केला आहे की “26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी, परमबीर सिंग, तत्कालीन डीआयजी एटीएस, यांनी दहशतवादी अजमल कसाबचा फोन जप्त केला मात्र तो फोन तपास, चाचणी दरम्यान कधीही समोर का आणला नाही असा गंभीर आरोप निवृत्त ACP समशेर पठाण यांनी परमबीर सिंग यांच्यावर केला आहे.
त्यांनी याबाबत माहिती देताना, मी या वर्षी जुलैमध्ये याबाबत एक पत्र लिहिले होते. पुरावे नष्ट केल्याबद्दल त्याला (परम बीर सिंग) NIA ने अटक करावी. त्याने हे जप्त केलेले पुरावे ISI ला विकले असावेत किंवा खंडणीसाठी माहिती वापरली असावी असा गंभीर आरोपही या पत्रात सेवानिवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांनी केला आहे.

याबाबत न्यूज एजन्सी ANI ने हे वृत्त दिले असून यात सेवानिवृत्त अधिकाऱ्याने केलेला पत्रव्यवहार प्रसिद्ध करण्यात आला आहे.

माजी गृहमंत्र्यांवर खंडणीचा आरोप करून फरार झालेल्या परमबीर सिंग यांच्यावर हा गंभीर आरोप पोलीस दलातीलच सेवानिवृत्त ACP असणाऱ्या अधिकाऱ्याकडून केला गेला असल्याने या प्रकरणातील मोठी माहिती उजेडात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सेवानिवृत्त ACP यांच्याकडून करण्यात आलेल्या या आरोपामुळे आता या गंभीर प्रकरणात ATS आणि राज्य सरकार काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.