राजकीय

प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार ! प्रकल्पग्रस्तांच्या आढावा बैठकीत महेश पासलकर यांचे आश्वासन

दौंड : तालुक्यातील वीर बाजी पासलकर व पानशेत धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न व प्रकल्पग्रस्तांच्या अडीअडचणीबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.महेश पासलकर यांनी पाटस पुनर्वसन येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी तालुक्यातील पुनर्वसित गावातील प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री. महेश पासलकर म्हणाले की, दौंड तालुक्यात प्रकल्पग्रस्तांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम आखला असून प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार आहे. प्रलंबित प्रश्नाच्याबाबत प्रकल्पग्रस्तांशी चर्चा विनिमय करताना पासलकर म्हणाले की, पुनर्वसित गावठाण मोजणीबाबत शासनाकडून मंजुर झालेल्या निधीतून तालुक्यातील एकूण ३३ गावठाणापैकी २७ गावठाणांच्या मोजण्या पूर्ण झाल्या असून, ६ गावठाणांच्या मोजण्या प्रलंबित आहेत. तरी, शासन स्तरावर पाठपुरावा करून एकूण १८ गावठाणांचे ७/१२ सदरी नोंदी झाल्या आहेत. तसेच उर्वरित १५ गावठाणांचे ७/१२ सदरी नोंदीबाबत उपविभागीय अधिकारी, दौंड-पुरंदर यांचेकडे राजपत्र प्रसिद्ध करणेकामी पाठपुरावा करत असल्याबाबत पासलकर यांनी प्रकल्पग्रस्तांना आश्वस्त केले.

पासलकर म्हणाले की, पिंपळगाव, नानगाव, सोनवडीसह उर्वरित ६ गावठाणांच्या मोजण्या लवकरच पाठपुरावा करून घेणार असून, गावठाणांच्या हद्दी कायम करणेबाबत देखील येत्या सोमवारपासून कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करून घेणार असून, हद्द कायम करतेवेळी प्रत्येक प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित रहावे.
यावेळी तालुक्यातील पुनर्वसित गावातील प्रतिनिधी , सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील , प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

5 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago