Categories: Previos News

दौंड शहरामध्ये व्यापाऱ्यांकडून 250 मास्कचे ‛मोफत’ वाटप



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

सर्वत्र ‛कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत असून या विषाणूजन्य आजारापासून बचावासाठी सध्या सॅनिटायझर, मास्क आणि विविध विषाणू प्रतिकारक हॅन्डवॉशला प्राधान्य देण्यात येत आहे. 

या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संघटनांकडूनही  जनजागृतीचे काम सुरु आहे. दौंड येथील कापड व्यापारी जयेश ओसवाल आणि त्यांच्या मित्र परिवारानेही आपली सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना २५० कापडी मास्क मोफतमध्ये वाटले आहेत. हे मास्क त्यांनी रेल्वे स्टेशन, बस स्टँड, जिल्हारुग्णालय येथे असलेल्या विविध नागरिकांना वाटप करून कोरोनापासून बचावासाठी मार्गदर्शन केले आहे. बाजारामध्ये मास्कचा तूटवडा व महाग भेटणारे मास्कला यांना पर्याय म्हणून २ हजार सुती कापडी मास्क ‛ना नफा, ना तोटा’ या माध्यमातून अल्पदरात देण्यात आले आहेत. यामुळे कोरोनापासून बचाव होण्यास मदत मिळत असून दुसरीकडे होतकरू टेलर आणि कामगारांना रोजगार मिळेल या माध्यमातून काही व्यापारी बंधुच्या  सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला आहे. कोरोना विषाणूबद्दल नागरिकापर्यंत योग्य जनजागृती होणे गरजेचे असून या उपक्रमाचा आदर्श इतरांनी घेऊन मदतीचा एक हात दिला तर नक्कीच या संकटावर मात करण्यास मदत होईल असे हा उपक्रम राबविलेल्या कापड व्यापारी जयेश रमेश ओसवाल यांनी सांगितले.

Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

5 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago