कुरकुंभ: सहकारनामा ऑनलाईन (आलीम सय्यद)
दौंड तालुक्यातील जिरेगाव येथे ग्रामपंचायत जिरेगाव यांच्या वतीने वृक्ष रोपण करण्यात आले. शासनाच्या पर्यावरण सप्ताहाच्या निमित्ताने जिरेगाव येथे ग्रामपंचायत ने २५० देशी-विदेशी झाडांचे वृक्ष रोपण केले यामध्ये वड, पिंपळ, चिंच, जांभुळ, गुलमोहर, नांद्रुक,अशा वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या झाडांचे वृक्ष रोपण करण्यात आले.
यावेळी सरपंच भरत खोमणे , उपसरपंच सोनबा मचाले, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र लोणकर, संतोष पवार, मोहन भंडलकर, अशोक मेरगळ, विकास मचाले,नवनाथ जाधव, युवराज खोमणे, अशोक सूर्यवंशी, अतुल जाधव, आदि ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.