पुणे : सहकारनामा
स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण (LCB) यांनी लोणिकाळभोर पोलीस ठाणे हद्दीत अवैध गुटखा वाहतुकीवर धडक कारवाई करत एकुण 25 लाख 44 हजार 172 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज बुधवार दि. 3/2/2021 रोजी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास डाॅ अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण तसेच पद्माकर घनवट, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या आदेशान्वये LCB चे पोलीस पथक पुणे सोलापुर रोडवर सरकारी जीपने पेट्रोलिंग करीत होते. हि गस्त सुरू असताना लोणीकाळभोर गावच्या हददीत राजेंद्र पेट्रोल पंपाचे समोर असणाऱ्या अंबरनाथ फर्निचर नावाच्या दुकानासमोर सुरेश मिलापचंद ओसवाल (वय वर्षे 44 रा.चितामणी पाश्र्वनाथ बिल्डीग, महात्मा फुले नगर, माळी मळा लोणीकाळभोर ता.हवेली जि.पुणे) तसेच अविनाश भारत जाधव (वय वर्षे 25 रा. नायगांव ता.हवेली जि.पुण) हे दोघे कोव्हीड या रोगाचे संसर्गजन्य आजाराची साथ सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष करून तसेच महाराष्ट्र राज्याचे अन्नसुरक्षा आयुक्त यांच्याकडील प्रतिबंधक आदेश क्रमांक असुमाअ/अधिसुचना/901/19/7 दिनांक 19/7/2019 नुसार महाराष्ट्र राज्यात गुटखा, पान मसाला किंवा अतिमता गुटखा किंवा पानसमला घटीत होवु शकेल असा पदार्थ सुगंधीत किंवा स्वादिष्ठ सुपारी/तंम्बाकु इंत्यादीचे उत्पादन/साठा/वितरण/वाहतुक तसेच विक्री यावर बंदी आहे हे माहीत असताना व गुटखा हे मानवी जिवीतास अपायकारक असा प्रतिबंधक पदार्थ आहे, याची जाणीव असताना देखील त्यांनी शासनाचे मनाई आदेशाचा भंग करून 25 लाख 44 हजार 172 रुपये (गुटखा, वाहन ल, मोबाईल व रोखरक्कम सह) किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा व साधने त्याचे ताब्यातील महेंद्र बोलेरो पिकअप नंबर एम.एच.12/एस.एफ/6933 मध्ये स्वतःचे आर्थीक फायदयाकरिता बेकायदेशीरपणे वाहतुक करीत असताना मिळुन आले.
त्यामुळे त्यांच्या विरूध्द पोलीस हवालदार राजु पुणेकर यांनी भा.द.वि.क. 328, 188, 269, 273, 34 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 व त्या अंतर्गत नियम व नियमाने 2011 चे कलम 26(2) (प), 26(2) (अप), 27(3)(क्), 27 (3)(म्), 59 (पपप) सह साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम सन 1897 चे कलम 2,3,4 प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद लोणीकाळभोर पेालीस स्टेशनला दिली आहे.
सदर गुन्हयातील आरोपी नामे सुरेश मिलापचंद ओसवाल याचेवर यापुर्वी गुटख्याची विक्री, वाहतूक, साठा केलेबाबतचे एकूण 07 गुन्हे दाखल असून दिनांक 28/1/2021 रोजी अन्न व औषधे प्रशासन यांनी कारवाई केलेली असुन त्याबाबत लोणीकाळभोर पोस्टे गुरनं. 57/2021 प्रमाणे गुन्हा दाखल असुन त्या गुन्ह्यात सुध्दा तो फरारी आहे.
सदरची कामगिरी LCB चे वरिष्ठ पो नि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.रामेश्वर धोंडगे, स.फौ.श्री.दत्तात्रय जगताप, पोहवा श्री.राजु पुणेकर, पोहवा मुकुंद अयाचित, पोना सागर चंद्रशेखर, पोकॉ श्री.बाळासाहेब खडके यांनी केली आहे.