विजेचा रुद्रावतार ! विज पडून झाला 25 फुट खड्डा अण लागले पाणी, लोणीकाळभोर जवळील घटना



लोणी काळभोर : सहकारनामा  ऑनलाईन(शरद पुजारी)

सध्या सर्वत्र मान्सून पूर्व पावसाने धुमाकूळ घातला असून सोसाट्याच्या वार्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. काल शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पूर्व हवेलीतील बहुतेक सर्व गावामध्ये मेघगर्जेसह मुसळधार पाऊस पडला. यावेळी विजांचा कडकडाट होत होता. या कडकडाटात एक विज लोणीकाळभोर परिसरातील पठारेवस्ती येथे पडली. ज्या ठिकाणी ही वीज पडली त्या ठिकाणी जमिनीवर सुमारे पंचवीस फुटापर्यंत खड्डा पडला असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात असून त्या खड्ड्यामध्ये पाणी सुध्दा दिसत आहे. हा खड्डा विजेमुळे पडला की अजून कोणत्या कारणाने हे मात्र अजून अधिकृतपणे स्पष्ट झाले नाही मात्र या खड्ड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व जण आपापल्या घरात राहणं पसंत करतात. उन्हाळा चालू असल्याने उष्णतेची दाहकता वाढली आहे परंतु गेल्या दोन तीन दिवसापासून वातावरणात बदल झाला असून आकाशात ढगांची दाटी आहे संध्याकाळी सोसाट्याचा वारा सुटतो काल असाच मेघगर्जेसह मुसळधार पाऊस पडला. थेऊर नायगाव कुंजीरवाडीसह लोणी काळभोर येथेही मोठा पाऊस पडला. यावेळी जोरदार ढगांचा गडगडात व विजांचा कडकडाटाताल विज पठारेवस्ती लोणी काळभोर येथे कोसळली व तेथे मोठा खड्डा पडला