इंदापूर : पुणे, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेले उजनी धरण अखेर १०९.६८ टक्के भरले आहे. पुणे आणि धरण पाणलोट क्षेत्रात तीन-चार दिवसापासून सलग सुरु असलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याने रविवारी (दि,१०) १०९.६८ टक्के भरल्याने धरणाचे १६ दरवाजेउघडले असून यामधून २० हजार क्यूसेकने भीमा नदीपात्रात विसर्ग सुरु आहे.
उजनी धरण प्रशासनाकडुन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून दौंड येथून उजनी धरणात १२२०९ क्यूसेक वेगाने पाणी येणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उशिरा भरले आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग वाढल्यास धरणातून भीमा नदीद्वारे पाण्याचा विसर्ग वाढवला जाईल असेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.