Categories: Previos News

अवघ्या 24 तासात लावला 4 लाखाच्या चोरीचा छडा, खंडाळ्याचे सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या पथकाची दमदार कामगिरी



: सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथे असणाऱ्या बिअर बारचा दरवाजा तोडून बिअरबार मधील सुमारे 4 लाख 4 हजार 942 रुपयांची दारू, बिअर चोरून नेणाऱ्या आरोपींना अवघ्या 24 तासात जेरबंद करून मुद्देमाल हस्तगत करण्यात खंडाळा पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड आणि त्यांच्या पथकाला यश आले असून कुठलाही धागादोरा नसताना मोठ्या शिताफीने आरोपींना पकडल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहिती नुसार खंडाळा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 लगत असलेल्या हॉटेल साई सहारा बिअर बार व परमिट रूमचे लाकडी दरवाजा आणि कडी कोयंडा तोडून आतमध्ये असलेल्या 4 लाख 4 हजार 942 रुपयांची देशी, विदेशी कंपनीची दारु चोरट्यांनी चोरून नेली होती. याबाबत बारचे मालक यांनी 6 मे रोजी खंडाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर सदर चोरीच्या गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघडकीस आणून गेलेली मालमत्ता हस्तगत करण्याच्या सुचना साताराच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, साताराचे अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी प्रभारी अधिकारी हनुमंत गायकवाड व तपास अधिकारी स्वाती पवार यांना दिल्या होत्या. यानंतर प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी गोपनीय माहिती मिळवत गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील कर्मचारी पो.ना.सचिन वीर प्रशांत धुमाळ व बालाजी बडगावे यांना सोबत घेत  संशयित आरोपी  प्रशांत विलास ढमाळ रा. पारगाव ता.खंडाळा याने त्याचा साथीदार सुरेश दत्तात्रय कुंभार (रा.असवली,ता.खंडाळा) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने बार फोडला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्याप्रमाणे प्रशांत ढमाळ याचा शोध घेतला असता तो फरारी झाला असल्याचे समजले त्यांनतर त्याचा साथीदार सुरेश दत्तात्रय कुंभार यास अटक करून व अल्पवयीन मुलास ताब्यात घेवून त्यांना विश्वासात घेवून विचारपूस केली असता तिघांनी मिळून बार फोडून त्यातील माल हा मुख्य आरोपी  प्रशांत ढमाळ याच्या अॅमेज कारमधून वाहून नेहून विक्री केली असल्याचे कबुली दिली. यानंतर सखोल तपास केला असता तो माल त्यांनी आरोपी समीर अब्दूल शेख (रा. पारगाव ता. खंडाळा),

आश्पाक झाकीर काझी (रा.मोजे अहिरे.ता.खंडाळा),  जहाँगिर मकबुल पठाण (रा. पारगाव ता.खंडाळा), सुशिल कुमार सुरेंद्र गुप्ता (रा. खंडाळा) यांना विक्री केला असल्याचे समोर आले यानंतर वरील सर्व आरोपींना गुन्ह्यात  अटक करून तपास केला असता त्यांनी चोरीच्या गुन्ह्यातील माल खरेदी करून त्यांची चोरटी विक्री केली असल्याची कबुली दिली आहे. त्यांचेकडून विक्री केलेल्या मालाची रोख रक्कम रुपये 1 लाख 10 हजार रुपये तसेच 73 हजार 952 रुपयांच्या वेगवेगळया कंपन्याच्या 180 मिली, 220 मिली तसेच 90 मिलीच्या 646 बॉटल्स जप्त करण्यात आलेल्या आहेत. तर चोरीचा माल वाहतुक करण्याकरिता वापरण्यात आलेली आशपाक काझी यांच्या मालकीची असलेली 1 लाख रुपये किमतीची व्हिस्टा इंडीका कार जप्त करण्यात आलेली असून एकूण 2 लाख 83 हजार 952 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. यातील मुख्य आरोपी प्रशांत ढमाळ हा फरारी असून त्याचा शोध घेण्याचे काम चालू आहे. उर्वरीत 5 आरोपींना अटक करून न्यायालयात उभे केले असता त्यांना 11 मे पर्यंत

पोलीस कोठडी मंजूर करण्यात आलेली असून गुन्हयाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार या करीत आहेत. सदरची कारवाई ही श्रीमती तेजस्वी सातपुते पोलीस अधीक्षक सातारा व धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक सातारा, तानाजी बरडे उप विभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार, पो.ह.नितिन नलावडे, संजय धोरणे, पोलीस नाईक सचिन वीर, प्रशांत धुमाळ बालाजी वडगावे यांनी केली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago