Categories: Previos News

दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1558 नवीन रुग्ण! पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली 6,625

नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी

देशात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना विषाणू पुन्हा एकदा सक्रिय होऊ लागला आहे.

देशाची राजधानी दिल्लीमध्येही कोरोनाने कहर केला असून गेल्या 24 तासात दिल्लीत 1558 नवीन रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत यावेळी एका दिवसातली ही सर्वाधिक नोंद आहे. यापूर्वी, शुक्रवारी 1534 आणि गुरुवारी 1515 नवीन प्रकरणे नोंदली गेली होती.  

म्हणजेच सलग तिसर्‍या दिवशी दिल्लीत कोरोनाचे 1500 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. मात्र जमेची बाब म्हणजे गेल्या 24 तासांत उपचारानंतर 974 बरे झाले आहेत तर दुःखद म्हणजे 24 तासात यातील 10 लोक मरण पावले आहेत.

बुधवारी दिल्लीत 1254 आणि मंगळवारी 1101 रुग्ण आढळले होते. कोरोनाची नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर दिल्लीत आता कोरोना रुग्णांची संख्या 6 लाख 55 हजार 834 झाली असून उपचारानंतर एकूण 6 लाख 38 हजार 212 रुग्ण बरे झाले आहेत. 

तर 10 लोकांच्या मृत्यूनंतर कोरोना विषाणूमुळे दिल्लीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 10 हजार 997 वर पोहोचला आहे तर पॉझिटिव्ह असलेल्यांची  संख्या वाढून 6,625 इतकी झाली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

6 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

19 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

21 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

23 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago