Categories: Previos News

22 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

आजची तरुणाई कधी कोणते पाऊल उचलेल हे सांगता येत नाही. किरकोळ गोष्टी किंवा थोडाजरी ताण जाणवला तरी आजची मुले टोकाचे पाऊल उचलताना दिसतात. मात्र हे पाऊल त्यांनी का उचलले आणि त्यामागे नेमके सत्य काय हेही समजणे महत्त्वाचे असते.

पुण्यातही अशीच एक धक्कादायक घटना घडली असून अवघे 22 वय असणाऱ्या तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना धायरी येथे घडली आहे.

कोमल महादेव बांदल असे आत्महत्या केलेल्या या तरुणीचे नाव आहे. तिने मंगळवारी आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली असून मृत्यूपूर्वी तिने चिट्ठी लिहून आपल्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरु नये असेही लिहून ठेवले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मृत झालेली तरुणी ही तिचे आई, वडील आणि भावासोबत धायरी येथे राहात होती. 

तिने आपले शिक्षण 12 वी पर्यंत पूर्ण केल्यानंतर  नोकरी करण्यास सुरुवात केली होती.

असंही सांगितलं जातंय की लॉकडाऊनच्या अगोदर तिची नोकरी गेली होती. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. त्यामुळे  सिंहगड पोलीस या आत्महत्या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

16 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago