| सहकारनामा |
मुंबई : नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली असून त्यांनी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
सोबतच या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो आणि या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल असे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे.
यापुढे अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घ्यावी आणि राज्यातील अन्य सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांच्याकडून संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून अन्य रुग्णांना इतर रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर आवश्यक उपचार तत्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.