दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड तालुक्यातील यवत ग्रामीण रुग्णालयाच्या हद्दीमधील काल दि.10 जुलै रोजी 22 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती त्या पैकी 21 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून बोरीऐंदी या गावातील एका इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी माहिती दिली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता येणारे रिपोर्ट हे काहीसे दिलासा देणारे ठरत असून नागरिकांनी योग्य पद्धतीने अटी व शर्तींचे नियोजन केल्यास निश्चितच कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होणार आहे.