दौंड’मध्ये ‛गांजाची शेती’ पकडली : 21 लाखाच्या गांजासह आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) ची धडक कारवाई



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण पथकास दौंड परिसरात गांजा या गुंगीकारक वनस्पतीची

शेती होत असलेबाबत माहीती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली होती. सदरचा प्रकार हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मा.श्री.संदीप पाटील पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे श्री.

पद्माकर घनवट, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी श्री.दत्तात्रय गुंड यांचे अधिपत्याखाली तपास पथकाची नेमणुक केली व त्यांना योग्य त्या सुचना व आदेश केले. त्या प्रमाणे सदर पथकाने दौड परिसरात माहिती घेत असताना मौजे गिरीम गावचे हदित ता. दौंड जि. पुणे येथे इसम नामे दत्तू

शंकर शिंदे (वय ४७ वर्षे, रा. शिंदे वस्ती, गिरीम ता. दौंड जि. पुणे) हा आपले शेतीत गांजा या गुंगीकारक वनस्पतीची झाडे लावून त्याची शेती करीत असलेबाबत गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली. सदर माहीतीची खातरजमा करून माहीती खरी असल्याचे निष्पण्ण झालेने सदर बाबत पुढील

कायदेशिर कारवाई करणेकरीता पोलीस निरीक्षक दौड पोलीस स्टेशन यांना माहीती देण्यात येवून त्यांचे सोबत

संयुक्त पथकाने मौजे गिरीम गायचे हदित ता. दौंड जि. पुणे येथे छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नामे दत्तू शंकर शिंदे, (वय ४७ वर्षे, रा. शिंदे वरती, गिरीम ता. दौंड जि. पुणे) हा आपले शेतीत गांजा या गुंगीकारक वनस्पतीची झाडे लावून त्याची शेती करीत असताना मिळून आला आहे. सदर गांजाची शेती मिळून येताच कायदेशिर कारवाई करून गांजाची एकुण १७३ झाडे व विक्री करीत ठेवलेला सुक्या स्वरूपाची

गांजाची दोन गोणी असा एकुण १४० किलो १०० ग्रॅम वजनाचा मुद्येमाल एकुण किंमत रूपये २१,०१,५००/चा मुद्देमाल पंचनाम्याने हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरची शेती करणारा इसम नामे दत्तू शंकर

शिंदे यास ताब्यात घेण्यात आले आहे. दौड पोलीस स्टेशनचे कल्याण किसन शिंगाडे, पो.हवा.ब.नं. २०९ यांनी दिले तकारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. सुनिल महाडीक, दौंड पोलीस स्टेशन हे करीत आहेत. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती ऐश्वर्या शर्मा, (भा.पो.से.) यांचे मार्गदर्शनाखाली खालील पथकाने केलेली आहे. सदर कारवाईमध्ये

(१) पद्माकर घनवट

पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण (२) सुनिल महाडीक

पोलीस निरीक्षक, दौड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण,  दत्तात्रय गुंड

सहा.पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण

(३) दत्तात्रय जगताप

सहा.पोलीस उप निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण (४) रविराज कोकरे

पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण (५) अनिल काळे

पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण (६)सचिन गायकवाड

पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण (७) रऊफ इनामदार

पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण (८) गुरूनाय गायकवाड

पोलीस नाईक, स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण (९) सुभाष राऊत

पोलीस नाईक, स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण (१०) चंद्रकांत जाधव

पोलीस नाईक, स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण (११)उमाकांत कुंजीर

पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण (१२)महेश गायकवाड

पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण (१३) निलेश कदम

पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण (१४) काशिनाथ राजापुरे

पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण (१५) समाधान नाईकनवरे

पोलीस कॉन्स्टेबल, स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण यांनी सहभाग घेतला.