Categories: Previos News

दोन मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड, 21 हजाराचा मुद्देमाल जप्त, 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल



बारामती : सहकारनामा ऑनलाइन.

बारामती येथील एमआयडीसीच्या कटफळ चौकात अवैध मटका जुगार अड्ड्यावर बारामती क्राईम ब्रँचच्या पथकाने धाड टाकून सुमारे 21 हजाराचा मुद्देमाल  जप्त केला असून पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती परिसरात दोन मटका जुगार अड्डे सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना मिळाली असता त्यांनी बारामती क्राईम ब्रँचचे प्रमुख पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना सांगून त्यांना या ठिकाणी धाड टाकण्यासाठी सूचना करण्यात आली होती त्या नुसार बारामती क्राईम ब्रांचचे पोलीस जवान आणि बारामती तालुका पोलीस स्टेशन चे जवान यांच्यासह अचानक दोन मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकला असता या ठिकाणी राजेंद्र तावरे, रा. सांगवी ता. बारामती, जि. पुणे (मटका मालक) राम काकडे (रा. चौधर वस्ती, ता. बारामती) राजेंद्र चांगळे, (रा .चौधर वस्ती, ता बारामती) लक्ष्मण थोरात, (रा. झेंडे वस्ती, ता बारामती) सुनील चंदनशिवे, (रा. तांदुळवाडी, ता बारामती)  हे इसम कल्याण मटका नावाचा मटका जुगार चालवत असल्याचे आढळून आले. 

त्यावेळी त्यांच्याकडून २०,९०० रोख रक्कम,        मटका जुगार घेण्याची साधने-पेन, मटका बुके इ.जप्त करण्यात आले. वरील कारवाई बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, क्राईम ब्रँच बारामतीचे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे,  

तसेच बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस जवान  राजेंद्र जाधव, आबा बंडगर, आदींनी केली

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago