खंडाळा पोलिसांकडून खुनाच्या गुन्ह्यासह 21 चोरीचे गुन्हे उघडकीस



सातारा : सहकारनामा ऑनलाईन

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाकडाऊन असताना वरील खंडाळा येथील पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड व कर्मचारी यांचा समावेश असलेल्या पोलीस पथकाने रात्रंदिवस अथक परिश्रम घेऊन जिवाची परवा न करता

सदर गुन्ह्यांची व्याप्ती सातारा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यामध्ये असताना त्याठिकाणी जाऊन गुन्हे उघडकीस आणण्याचे काम केले आहे. याकामी सातारच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सातपुते व मा.धिरज पाटील सो, अपर पोलीस अधीक्षक सो, सातारा यांनी मार्गदर्शन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भादे येथील खुनाच्या गुन्हयासह विविध पोलीस ठाण्यातील चोरीचे एकूण २१ गुन्हे उघडकीस त्यामध्ये १४

मोटार सायकल, दोन ट्रॅक्टर (अवजारांसह) तीन घरफोडी चोरी, एक डी.सी.सी.बँक फोडण्याचा प्रयत्न व

एक प्रेमी युगलास लुटण्याचा प्रयत्न असे एकूण २१ गन्ह्यातील रुपये १२ लाख ५५ हजार ४०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

वरील गुन्हा दि.१७ मार्च रोजी शिरवळ पोलीस ठाणे येथे दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे १५-२० दिवस पाठपुरावा करुन माग काढण्यात आला संशयित आरोपी नामे १) करण संजय ठोंबरे वय-१९वर्ष, रा.खेड, ता.खंडाळा, जि.सातारा २) हिमालय सतिश धायगुडे

वय-१९वर्ष रा.खेड, ता.खंडाळा, जि.सातारा ३) अक्षय तात्याबा धुलगुडे वय-२१वर्ष रा.आरडगाव, ता.फलटण,

जि.सातारा ४) साहिल सतिश वेळे वय-१९वर्ष, रा.सुखेड, ता.खंडाळा जि.सातारा यांचा सहभाग निष्पन्न झाले. सदर आरोपींचा मौजे सुखेड, खेड, लोणंद येथे शोध घेतला असता ते मिळुन न आल्यामुळे त्यांचे मोबाईल नंबर प्राप्त करुन तांत्रिक बाबींचा आधार घेऊन शोध घेतला असता ते दि.२२ मार्च रोजी अकलुज, ता.माळशिरस येथे असल्याचे समजले. तेथे गेल्यानंतर देखिल ते मिळुन न आल्यामुळे त्यांचे वेळोवेळी लोकेशन

प्राप्त करुन शिताफिने पाठलाग एकाचवेळी ५ जणांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून त्यांचे साथीदार ५) राम कमलाकर सत्रे वय-२श्वर्ष मुळगाव-

उस्मानाबाद ६) सागर दत्तात्रय शेळके रा.निंबोडी, ता.खंडाळा ७) अंकुश कोंडीबा सूर्यवंशी रा.बालेघर, ता.वाई व

दोन विधी संघर्ष बालक यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांनाही अटक व ताब्यात घेण्यात आले आहे.

प्रस्तुत गुन्ह्याचे तपासामध्ये त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांचा साथीदार राम कमलाकर सत्रे वय-२२वर्ष, रा.मुरुम, ता.उमरगा, जि.उस्मानाबाद याचे साथीने फलटण उपविभागामधील खंडाळा, लोणंद व शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर

गुन्ह्याची निष्पन्न होण्याची व्याप्ती वाढल्यामुळे फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी दि.बरडे,

 यांनी शिरवळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळाचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, सागर अरगडे, पोलीस उप निरीक्षक,

शिरवळ पोलीस ठाणे, रविंद्र कदम, अप्पासाहेब कोलवडकर, वैभव सूर्यवंशी, अमोल जगदाळे, स्वप्निल दौंड,

श्रीनाथ कदम लोणंद पोलीस ठाणे, सचिन वीर खंडाळा पोलीस ठाणे यांचे पथक तयार केले. सदर पथकाने आरोपीकडे सखोल तपास केला असता त्यांनी लोणंद पोलीस ठाणेतील एकुण ५ गुन्हे, खंडाळा पोलीस

ठाणेतील तीन गुन्हे व शिरवळ पोलीस ठाणेतील चार गुन्हे  त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील जेजुरी पोलीस ठाणेतील पाच गुन्हे, लोणीकंद पोलीस ठाणेतील दोन, राजगढ पोलीस ठाणेतील एक व भोर पोलीस ठाणेतील एक असे एकुण २१ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. वरील २१ गुन्ह्यांमध्ये एकुण १४ मोटार सायकल, २ ट्रॅक्टर (औजारांसह), तीन घरफोडी, मौजे अहिरे, ता.खंडाळा येथील डी.सी.सी.क फोडण्याचा प्रयत्न व मौजे धनगरवाडी, ता.खंडाळा गावचे हद्दीत एका प्रेमी युगलास लुटण्याचा प्रयत्न इत्यादी गुन्ह्यांचा समावेश असून त्यामध्ये एकुण १२ लाख ५५ हजार ४०० रुपयांचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच शिरवळ पोलीस ठाणेकडील गु.र.न.११/२०२० भा.दं.सं.कलम ३०२, २०१, १२०(ब), ३४ या दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने यातील आरोपी करण संजय ठोबरे, राम कमलाकर सत्रे व अंकुश कोंडीबा सर्यवंशी यांचेकडे सखोल तपास केला असता त्यांनी गुन्ह्यातील अनोळखी इसमास वीर धरण या ठिकाणी आणून दगडाने ठेचुन मारुन खून केल्याची कबुली दिली असून सदर गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल तपास सुरु आहे.