Categories: Previos News

‛दौंड’मधून उत्तर प्रदेशाला जाणारी रेल्वे आज ऐवजी उद्या 21 तारखेला दुपारी 12 वाजता दौंड स्थानकातून सुटणार

दौंड : सहकारनामा ऑनलाईन

कोरोनाच्या विषाणूमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय मजूर, कामगार आपापल्या गावाकडे जात आहेत या मजुरांना आपल्या राज्यात जाण्यासाठी सरकारने रेल्वेची व्यवस्था केली असून या रेल्वेने मजुरांना आपल्या गावी पोहोचणे आता सहज शक्य होत आहे. दौंड मधूनही अनेक मजूर आपल्या गावी जात असून आज 20 तारखेला उत्तर प्रदेशाला जाणारी रेल्वे रद्द झाली असून ती उद्या 21 तारखेला दुपारी 12 वाजता दौंड रेल्वे स्थानकामधून सुटणार असल्याची माहिती डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर, सोलापूर डिव्हिजन यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 20/05/2020 रोजी उत्तरप्रदेशात रेल्वे पाठविणे शक्य नसल्याचे सांगत सांगितल्याने आज जाणारी  रेल्वे उद्या दिनांक 21/05/2020 रोजी दौंड रेल्वे स्थानक येथुन दुपारी 12.00 वा सुटेल याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन केले आहे. याबाबतची माहिती दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी दिली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

14 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago