Categories: Previos News

भिवंडी इमारत दुर्घटनेत आत्तापर्यंत 20 जणांचा मृत्यू, अजूनही बचावकार्य सुरू

मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

भिवंडी इमारत दुर्घटनेत आत्तापर्यंत वीस जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ANI च्या हवाल्याने मिळत आहे.

इमारत कोसळण्याच्या ठिकाणी अजूनही बचावकार्य सुरूच असून या घटनेत वीस जणांचा मृत्यू आल्याने सर्वत्र हळ हळ व्यक्त होत आहे.

काल भिंवडी परिसरात पहाटेच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस आणि NDRF टीम घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी या कोसळलेल्या इमारतीच्या  ढिगाऱ्याखालून अनेकांना वेळीच बाहेर काढले होते. काल बचावकार्य सुरू असताना त्यापैकी 5 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते.

इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंडमधील जिलानी मंजिल हि तीन मजली इमारत कोसळून हि दुर्घटना घडली.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

4 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

17 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

19 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

21 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago