आज दौंड शहर आणि परिसरातील 20 जण कोरोना पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा

दौंड तालुका आणि शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. 

आज दि. 12 मार्चरोजी आलेल्या अहवालामध्ये एकाच दिवसात तब्बल 20 जण कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये 104 जणांचे नमुने घेण्यात आले होते त्या पैकी 16 पुरुष आणि 4 महिला ह्या कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यात 9 जण दौंड शहरातील तर 11 जण हे ग्रामिण भागातील आहेत. 

यामध्ये नानविज 3, गोपाळवाडी 3, खोरवडी 2, कुरकुंभ 1 अन8 तुकाईनगर 2 असे तब्बल 20 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.