Categories: Previos News

सासवडमध्ये गावठी पिस्तूलासह 2 जिवंत काडतुसे जप्त, Lcb ची धडक कारवाई



पुणे : सहकारनामा

सासवड पोलिस स्टेशन हद्दीतील जेजुरी नाका येथे एक गावठी पिस्तुल २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. हि कामगिरी पुणे ग्रामिण गुन्हेअन्वेषण विभाग (Lcb) कडून करण्यात आली आहे.

पुणे ग्रामिण चे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी पुणे ग्रामिण जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आले आहेत. 

त्यावरुन सासवड पोलिस स्टेशन हद्दीत गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहिती वरून जेजुरी नाका परिसरात एक इसम आपल्या जवळ गावठी बनावटीचे पिस्तुल घेऊन फिरत असल्याचे पोलिसांना समजले. सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या एका विशिष्ठ पथकाने त्याठिकाणी सापळा रचून काळ्या रंगाच्या मोपेड गाडीवर फिरत असलेल्या इसमास ताब्यात घेतले असता त्याची अंग झडती घेतली त्याचे पॅन्टच्या आत पाठी मागील बाजूस  कम्बरेस एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तुल मिळून आले. सदरच्या पिस्तूलाचे 

मॅगजिन  चेक केले असता त्यामध्ये २ जिवंत काडतुसे मिळून आले. 

सदर इसमाचे नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव गौरव उर्फ माया भाई  बाळासो कामथे (वय २२ वर्षे रा खळद गाव ता पुरंदर जि पुणे) असे सांगितले.

सदरील आरोपी कडून खालिल मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

१) एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तुल मॅगजीन सह : ३५,००० रु किंमतीचे

२) दोन जिवंत काडतुसे : २०० रु किंमतीचे 

३) एक काळ्या रंगाची होंडा कंपनीची ऍक्टिवा मोटार सायकल :५०,००० रु किंमतीची 

एकूण : ८५,२०० रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .सदरील आरोपी मुद्देमाल सह पुढील तपासकामी सासवड पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे. 

सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक  मिलिंद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पो हवा चंद्रकांत झेंडे, पो ना विजय कांचन, पो कॉ धिरज जाधव, अभिजित एकशिंगे दगडू विरकर यांनी केली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago