पुणे : सहकारनामा
पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये दरोडे टाकणाऱ्या अट्टल दरोडेखोरांच्या टोळीला पकडण्यात पुणे ग्रामिण LCB शाखेला यश आले असून त्यांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि.14/12/2020 रोजी आळेफाटा पोलीस स्टेशन येथे गु. र.नं. 430/2020 भा.द.वि कलम 395 नुसार गुन्हा दाखल झाला होता. सदरच्या गुन्हयाचे स्वरूप लक्षात घेता ह्या गुन्ह्यातील आरोपींचा त्वरित शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या सूचना पुणे ग्रामिण पोलिस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.
वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींची माहिती घेण्यासाठी LCB पोलीस पथकाने आळेफाटा,पारनेर, निघोज, साकोरी या भागात शोध सुरू केला असता शिरूर पोलीस स्टेशन गु. र. नं.748/2019 भा.द.वी कलम 395 मधील फरार आरोपी विशाल उर्फ कोंग्या काळे हा टाकळी हाजी परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.
त्यानुसार निघोज बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे पथक सापळा लावून थांबले असता दोन इसम निघोज बाजूकडे जाताना दिसले. त्यांना पोलिसांचा संशय आल्याने ते पळून जाऊ लागताच पोलिसांनी या इसमांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. यावेळी या इसमांची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे 1) विशाल उर्फ कोंग्या नरेश काळे (वय 26 वर्षे रा. निघोज ता.पारनेर जि. अ.नगर) 2) दिपक उर्फ आशिक आझाद काळे (वय 25 वर्षे रा. निघोज ता. पारनेर जि.अ नगर) असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी मागील चार ते पाच महिन्यात ओतूर, आळेफाटा, मंचर लोणीकंद, पारनेर या भागात त्यांच्या इतर साथीदारांसोबत गुन्हे केल्याचे कबूल केले.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी संबंधित पोलीस स्टेशनकडून माहिती घेतली असता आरोपींनी
1) आळेफाटा पोलीस स्टेशन गु.र.नं.430/2020 भा.द.वी.कलम 395
2) आळेफाटा पोलीस स्टेशन गु.र.नं.426/2020 भा.द.वी.कलम 394,34
3) ओतूर पोलीस स्टेशन गु.र.नं.233/2020 भा.द.वी.कलम 457,380
4) मंचर पोलीस स्टेशन गु.र.नं.688/2020 भा.द.वी.कलम 394,34
5) लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.नं.1007/2020 भा.द.वी.कलम 380
6) पारनेर पोलीस स्टेशन गु.र.नं.111/2020 भा.द.वी.कलम 457,380
7 ) बेलवंडी पोलीस स्टेशन गु.र.नं.594/2020 भा.द.वी.कलम 394
8 ) शिरूर पोलीस स्टेशन गु.र.नं.748/2019 भा.द.वी.कलम 395 असे वरील पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.
सदरची कारवाई हि पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक श्री विवेक पाटील सो, उप. विभा.पो.अधिकारी. मंदार जवळे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. नेताजी गंधारे,
सफो.दत्तात्रय गिरमकर, पोहवा. हनुमंत पासलकर, पोहवा. उमाकांत कुंजीर,
पोहवा.विक्रम तापकीर, पोहवा. सचिन गायकवाड, पोहवा. काशीनाथ राजापूरे,
पोना.दिपक साबळे, पोना. जनार्दन शेळके,
पोना. राजू मोमीन, पोना. अजित भुजबळ,
पोना. मंगेश थीगळे, पोशी.संदीप वारे,
पोशी. अक्षय नवले, पोशी. निलेश सुपेकर,
पोशी.अक्षय जावळे यांनी केली आहे.