– सहकारनामा
पुणे : पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी दिलेेल्या आदेशावरून वॉन्टेड फरार आरोपींचा (LCB) स्थानिक गुन्हे शाखेकडूूून शोध घेतला जात आहे.
आज या पथकास यवत पोलिस स्टेशन गु र नं 959/2018 भा द वी 399,332,353, 402, भा ह का कलम 3(25) या गुन्ह्यात गेली 2 वर्षा पासून फरार असलेला आरोपी विशाल शंकर महंगडे (वय 32 वर्षे रा परखंडी ता.वाई जि.सातारा) भोर येथे शिवाजी महाराज चौक येथे असल्याची गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली होती.
या माहितीवरून या पथकाने वरील ठिकाणी सापळा रचून पकडत या आरोपीस पुढील तपास कामी यवत पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. वरील आरोपी वर यापूर्वी 9 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
त्यावर असलेले गुन्हे आणि पोलीस ठाणे पुढील प्रमाणे…
1) राजगड पो स्टे पुणे ग्रामिण
गु र नं 158/2012 भा द वी का 392,439,34
2) राजगड पो स्टे पुणे ग्रामिण
गु र नं 175/2012
भा द वी का 392,439,34
3) सातारा तालुका पो स्टे
गु र नं 207/2012
भा द वी का 394, 34
4) सातारा सिटी पो स्टे
गु र नं 398/2012
भा द वी का 379,34
5) सातारा सिटी पो स्टे
गु र नं 431/2012
भा द वी का 379,34
6) सातारा सिटी पो स्टे गु र नं 183/2012 भा द वी का
394,439,34
7) फलटण पो स्टे गु र नं
164/2012 भा द वी का 395
8) पुसेगाव पो स्टे गु र नं 60/2014 भा द वी का 307,323,34
9) खंडाळा पो स्टे गु र नं 161/2016 भा द वी का 397, 394,341,34 असे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई ही मा पोलिस अधिक्षक श्री अभिनव देशमुख सो तसेच अप्पर पोलिस अधिक्षक, श्री मिलिंद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे,
पो नाईक विजय कांचन, पो कॉन्स्टेबल धिरज जाधव यांनी केली आहे.