अख्तर काझी
दौंड : दिनांक 11 ऑगस्ट रोजी दौंड पोलीस स्टेशन हद्दीत वॉन्टेड आरोपीचा शोध घेत असताना दौंड पोलीस स्टेशन भादवी 392, 34 मधील चोरीस गेलेला मोबाईल परश्या काळे हा वापरत असून तो धावडे वस्ती खोरवडी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
सदरची बातमी ही त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना कळवून त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन सापळा रचला. त्यावेळी सदर इसमास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव प्रशांत स्वरुपलाल उर्फ दुष्काळ्या काळे (वय 20 वर्षे रा.धावडेवस्ती, खोरवडी दौंड तालुका दौंड जिल्हा पुणे) असे सांगितले. त्याचे जवळील त्याचे वापरता मोबाईलची पडताळणी केली असता सदरचा मोबाईल हा दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील चोरीस गेलेला मोबाईल असल्याची खात्री झाली. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील गु.र.नं.658/2023 भादवी क 392, 34 प्रमाणे आणखी एक गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. त्याच्याकडून खालील पैकी गुन्हे उघडकिस आले आहेत.
1.दौंड पो.स्टे. गु.र.नं.657/2023 भादवी क. 392,34
2.दौंड पो.स्टे. गु.र.नं.658/2023 भादवी क. 392,34
सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई करणे कामी दौंड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, पोलीस उपअधीक्षक स्वप्नील जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे
स.पो.नि. राहुल गावडे, पो.हवा.सचिन घाडगे, पो हवा अजित भुजबळ, पो.हवा.असिफ शेख
पो हवा राजू मोमीन, पो.हवा.अतुल ढेरे, सहा.फौ मुकुंद कदम यांनी केली आहे.