Categories: Previos News

तोतया पोलिसांनी ‛पारगाव’ येथे इसमास लुटले, 2 तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या घेऊन तोतया पोलीस पसार



दौंड : सहकारनामा ऑनलाईन 

दौंड तालुक्यातील पारगाव येथे एका इसमास चार तोतया पोलिसांनी लुटल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत दत्तात्रेय विनायक रणदिवे (वय 57 रा. रांजणगाव सांडस, तालुका शिरूर जिल्हा पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि. 29 जुलै रोजी सकाळी 9 वाजता पारगाव ता. दौंड या ठिकाणी फिर्यादी यांना अज्ञात 4 अनोळखी इसमांनी आपण पोलीस असल्याची बतावणी करत फिर्यादी यांचे हातातील 2 तोळे वजनाच्या सोन्याच्या 2 अंगठ्या रुमालात बांधून देण्याचा बहाणा करत त्या हातातून काढून घेतल्या.

नंतर त्या अंगठ्या रुमालात बांधून देत फिर्यादी यांच्या खिशात ठेवण्याचा बहाणा करून रुमालात ठेवलेल्या सोन्याच्या 2 अंगठ्या फिर्यादीची नजर चुकवून पसार झाले. 

काहीवेळाने फिर्यादी यांनी आपला रुमाल तपासला असता आपली फसवणूक झाली असल्याचे आणि  तोतया पोलीस बनलेल्या चौघांनी सोन्याच्या 2 अंगठ्या फसवून घेऊन गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यांनी त्वरित यवत पोलीस ठाणे गाठत घडलेली सर्व हकीकत पोलिसांना सांगून गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धनंजय कापरे, पो.हवा. पानसरे हे करीत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

7 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

1 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

4 दिवस ago