दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड तालुक्यातील पारगाव येथे एका इसमास चार तोतया पोलिसांनी लुटल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत दत्तात्रेय विनायक रणदिवे (वय 57 रा. रांजणगाव सांडस, तालुका शिरूर जिल्हा पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि. 29 जुलै रोजी सकाळी 9 वाजता पारगाव ता. दौंड या ठिकाणी फिर्यादी यांना अज्ञात 4 अनोळखी इसमांनी आपण पोलीस असल्याची बतावणी करत फिर्यादी यांचे हातातील 2 तोळे वजनाच्या सोन्याच्या 2 अंगठ्या रुमालात बांधून देण्याचा बहाणा करत त्या हातातून काढून घेतल्या.
नंतर त्या अंगठ्या रुमालात बांधून देत फिर्यादी यांच्या खिशात ठेवण्याचा बहाणा करून रुमालात ठेवलेल्या सोन्याच्या 2 अंगठ्या फिर्यादीची नजर चुकवून पसार झाले.
काहीवेळाने फिर्यादी यांनी आपला रुमाल तपासला असता आपली फसवणूक झाली असल्याचे आणि तोतया पोलीस बनलेल्या चौघांनी सोन्याच्या 2 अंगठ्या फसवून घेऊन गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी त्वरित यवत पोलीस ठाणे गाठत घडलेली सर्व हकीकत पोलिसांना सांगून गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धनंजय कापरे, पो.हवा. पानसरे हे करीत आहेत.