बारामती : सहकारनामा
बारामती तालुक्यातील मोरगाव येथे बारामती मोरगाव रोडलगत असणाऱ्या एका पत्र्याच्या शेडमध्ये गावठी दारूची विक्री करणाऱ्या 2 महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल रजनी कांबळे यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीनुसार कावेरी राठोड आणि सलोनी राठोड या दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार पोकॉ रजनी कांबळे यांना दोन महिला या बारामती मोरगाव रोडच्या लगत एका पत्र्याच्या आडोश्याला गावठी हातभट्टीची दारू तयार करून ती जवळ बाळगुन आपल्या ओळखीच्या लोकांना चोरुन बेकायदेशीर रित्या विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती यावरून पोलिसांनी या दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.