|सहकारनामा|
दौंड : दौंड तालुक्यातील वरवंड-कडेठाण या रस्त्यासाठी 2 कोटी 40 लाख 63 हजार रुपये मंजूर झाले असून या कामाचा शुभारंभ दौंडचे आमदार राहुल कुल यांच्याहस्ते करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर अनेक विकासकामांना खीळ बसली होती, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पुन्हा एकदा दौंड तालुक्यात झपाट्याने विकासकामे सुरू झाली असून लवकरच हे कामही पूर्ण होऊन नागरिकांना या रस्त्याचा मोठा फायदा होणार आहे.
रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास आमदार राहुल कुल यांसह नामदेव बारवकर, संजय दिवेकर, गोरख दिवेकर, तानाजी दिवेकर, अशोक फरगडे, शिवाजी दिवेकर, विजय जाधव, संजय जाधव, अभिजित काळे हे उपस्थित होते.