स्थानिक गुन्हे शाखेने 2 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या, 4 गुन्हे उघडकीस



पुणे : सहकारनामा

स्थानिक गुन्हे शाखा व वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशनने मोठी कारवाई करत 2 सराईत दरोडेखोरांकडून वडगाव निंबाळकर येथील दरोडा, घरफोडी, जबरी चोरी तसेच इंदापूर (काटी) येथील दरोडा असे एकूण 4 गुन्हे उघडकीस आणले आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार इंदापूर पोलिस स्टेशन गुन्हा र नं 1218/2020 भा द वी 395 नुसार दाखल गुन्ह्यात आरोपी यांनी दरोडा टाकतेवेळी दरवाज्यावर दगड टाकून घरात प्रवेश केला होता. यावेळी घरात असलेली महिला आणि लहान मुलीला कोयत्याचा धाक दाखवून घरातील सोन्या, चांदीचे दागिने, 1 मोबाईल असा एकूण 1 लाख 7 हजार रु किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता.



तर वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन गु.र.नं 61/2021भा द वी 395 सदरच्या गुन्ह्यात देखील आरोपी यांनी कोयत्याचा धाक दाखवून सोन्या, चांदीचे दागिने 2 मोबाईल असा ऐकून 2 लाख 16 हजार रु किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. वडगाव निंबाळकर पो स्टे गु र नं 62/2021 भा द वी 457, 380 आणि वडगाव निंबाळकर पो स्टे गु र नं 313/2020  भा द वी 392, 34 वरील सर्व गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने cc tv फुटेज आणि रेकॉर्ड वरील आरोपी यांची माहिती घेत  गोपनीय माहितीवरून  विकास किरण शिंदे (वय 25 वर्षे रा नांदल ता फलटण जि सातारा) आणि रावश्या कोब्या काळे (वय 25 वर्षे रा काटी ता इंदापूर जि पुणे) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता वरील दोन्ही ठिकाणचे दरोडे आणि घरफोडी तसेच जबरी चोरीचा गुन्हा आपले इतर साथीदार मार्फत केल्याचे सांगितले आहे. 

वरील दोन्ही आरोपीना पुढील तपासकामी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले असून इतर आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू आहे. 

सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख सो, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांचे मार्गदशनखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस उप निरीक्षक शिवाजी ननवरे, पो हवा अनिल काळे, पो हवा रविराज कोकरे, पो ना राजू मोमिन, पो ना विजय कांचन, पो ना अभिजित एकशिंगे, पो कॉ धिरज जाधव तसेच वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सोमनाथ लांडे 

पो ना  पानसरे, पो कॉ सिताफ, पो कॉ खोमणे, भुजबळ, मारकड, यांनी केली आहे.