भुगाव (मुळशी) येथे अवैध गुटखा वाहतूक करणारा इसम 2 लाख 33 हजारांच्या मुद्देमालासह जेरबंद, LCB आणि पौड पोलिसांची संयुक्त कारवाई



पुणे : भुगाव ता.मुळशी येथे अवैद्यरीत्या गुटखा वाहतूक करणाऱ्या इसमास वाहनासह जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग LCB व पौड पोलिस स्टेशनच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना यश आले आहे. दोन्ही पथकांच्या संयुक्त कामगिरीत सुमारे २ लाख ३३ हजार ८८०/-रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील या अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.     

 दि.२४/०९/२०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पथक पौड पो स्टे परीसरात पेट्रोलिंग करीत असताना पोना बाळासाहेब खडके यांना गोपनीय खबऱ्या मार्फत बातमी मिळाली की, भुगाव  गावचे हद्दीत बालाजी ट्रेडिंग कंपनी नावाचे किराणा दुकानचा व्यवसाय करणारा इसम  मंगलराम भवरलाल चोधरी (वय ४२ वर्ष रा. पिरंगुट ता. मुळशी जि. पुणे) हा आपले ताब्यातील निळे रंगाची हुंडाई कंपनीची  i10 गाडीचे डिकीमध्ये विमल कंपनीचा प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करीत आहे. 

 त्यानुसार चांदणी चौक ते पिरंगुट रोडवर भुगाव येथे  स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पौड पो स्टे कडील पोसई श्रीकांत जाधव व पो ना जगदाळे यांचे मदतीने भुगाव येथे सापळा लावून इसम नामे मंगलराम भवरलाल चोधरी यास ताब्यात घेउन त्याचे गाडीचे डिकीची पाहणी केली असता त्या मध्ये २२८८०/- रु. चा विमल कंपनीचा प्रतिबंधीत गुटखा व हुंडाई कंपनीची i10 गाडी, मोबाईल फोन, रोख रक्कम  असा २,३३,८८०/- (दोन लाख तेहतीस हजार आठशे ऐंशी) रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. सदर इसम व  माल पंचनाम्याने जप्त करून पुढील कार्यवाहीसाठी पौड पोलीस स्टेशन यांचे ताब्यात दिले आहे. 

सदरची कार्यवाही ही मा.पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण डॉ.अभिनव देशमुख  मा.पोलीस निरीक्षक श्री.अशोक शेळके यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि रामेश्वर धोंडगे, पोउपनि श्रीकांत जाधव पौड, सफौ.दत्तात्रय जगताप, पो ना निवास जगदाळे पौड, पो.ना.बाळासाहेब खडके यांनी केली आहे.