दिलासादायक: 2 रुपये किलोने गहू तर 3 रुपये किलोने तांदूळ मिळणार, केंद्र सरकारची मोठी घोषणा



नवी दिल्ली : वृत्तसेवा

देश सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन सारख्या परिस्थितीमधून जात आहे. अशा वेळी देशातील लोकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे केंद्र सरकारने यावर उपाय काढत देशातील सुमारे 80 कोटी लोकांना स्वस्त दराने गहू आणि तांदूळ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

त्यामुळे 22 ते 25 रूपये किलोने मिळणारा गहू आता 2 रूपये किलोने मिळणार आहे तसेच तर 32 ते 36  रूपये किलोने मिळणारा तांदूळ आता 3 रूपये किलोने दिला जाईल असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे अशी माहिती केंद्रिय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. करोनाशी संपूर्ण जग लढत आहे त्यामुळे आपणही गाफील न राहता कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आणि त्याला हरविण्यासाठी घरात थांबणे, वारंवार हात धुणे, ताप, सर्दी, खोकला सारखी लक्षणे दिसली तर लगेच डॉक्टरांना दाखवणे हे उपाय गरजेचे असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.