पुणे : सहकारनामा
दौंड तालुक्यामध्ये ग्रामपंचायत इलेक्शन सुरू असून या इलेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणावर दारूचा वापर होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन विविध ठिकाणी पोलिसांच्या गस्ती सुरू आहेत.
तसेच संपूर्ण पुणे जिल्हयात अवैध धंदयावर कारवाई करणेसाठी पुणे ग्रााामिण पोलीस अधीक्षक यांनी आदेश दिले असल्याने त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस पथकातील सहा.पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोहवा. महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, पोना. गुरू गायकवाड यांचे पथक दिनांक ०४/०१/२०२१ रोजी दौंड पोलीस स्टेशन हद्दीत राहू-टाकळी रोड येथे पेट्रोलिंग करीत होते.
त्यावेळी या पथकास पाटेठाण गावच्या हददीत राहू-टाकळी रोड, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याजवळ सुरज निवास किरो (वय ३४ वर्षे रा.पाठेटाण ता.दौंड जि.पुणे) हा आर्थिक फायदयासाठी त्याकडे असणारी मारुती झेन कार नं.एमएच १२ बीजी ४२१९ मधुन बेकायदा बिगरपरवाना देशी विदेशी व गावठी हातभट्टी दारू आणि कार असा २,२५,५३४/- (दोन लाख पंचवीस हजार पाचशे चौतीस) रुपयांचा प्रोव्ही. माल वाहतुक करीत असताना त्यांना मिळून आला.
वरील पथकाने सदर आरोपी व ताब्यात घेण्यात आलेला मुद्देमाल हा यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेला आहे. तसेच आरोपी विरूध्द मुंबई प्रोव्ही. ॲक्ट कलम ६५ (ई) प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.