केडगाव-दापोडी येथे 2 लाख 20 हजार रुपयांचा चंदन साठा, मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर एक फरार…पुणे ग्रामीण LCB शाखेची कारवाई



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

पुणे ग्रामीण जिल्हयात अवैध धंदयावर कारवाई करणेसाठी मा.पोलीस अधीक्षक यांनी आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले गुन्हे शाखेचे पोलीस पथकातील पोहवा. महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरू गायकवाड यांचे पथक दिनांक दिनांक २२/०८/२०२० रोजी यवत पोलीस स्टेशन हद्दीत  पेट्रोलिंग करीत असताना पथकास, मौजे दापोडी, देशमुख वस्ती, देवई तरकारी सेंटर समोर ता.दौंड जि.पुणे येथे दोघे इसम दापोडी येथील रमेश करडे यास चंदनाची लाकडे विक्री करणेसाठी येणार असल्याची बातमी मिळाली होती. त्याप्रमाणे सदर पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून छापा टाकून चंदनाचे लाकडाची विक्री करणेसाठी आलेले दोघे आरोपी १) रामदास शहाजी माने वय २५ वर्षे रा.मुर्टी, उंबरवाडा ता.बारामती जि.पुणे  २) राजू बाबू शिंदे वय ३० वर्षे रा.दापोडी, वैदवाडी ता.दौंड जि.पुणे यांना मोटरसायकलसह ताब्यात घेतले. चंदनाचा माल घेणारा आरोपी रमेश बाबू करडे रा.दापोडी, ता.दौंड जि.पुणे हा हातातील चंदनाचे लाकडाचे पोते तेथेच टाकून पळून गेला. दोघे आरोपी व त्यांचेकडून मिळून आलेली १ मोटरसायकल, २ मोबाईल, रोख रक्कम १८,५००/-  व १,५४,००० / – रुपयाची चंदनाची २२ किलो वजनाची लाकडे असा एकूण कि.रु. २,२०,५००/- (दोन लाख वीस हजार पाचशे) चा माल जप्त करण्यात आलेला आहे.

सदर दोघे आरोपी व जप्त केलेला मुद्देमाल हा यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेला आहे. तिघे आरोपी यांचेविरूध्द भा.दं.वि.कलम ३७९, भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६, ४१, ४२ सह महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम १९६४ सुधारणा १९८८ चे कलम ३, ४ प्रमाणे प्रमाणे कारवाई केलेली आहे.