पोलिसांना धमकावून फरार असलेले ‛मोक्का’तील 2 आरोपी हडपसर पोलिसांच्या ताब्यात, 18 लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त



– सहकारनामा

पुणे : मोक्का सारखा गंभीर गुन्ह्यात फरार असलेला आणि पोलिसांना हवा असलेल्या आरोपीस हडपसर पोलिसांनी जेरबंद करणे आहे. या आरोपींकडून 18 लाख 17 हजार 495 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुणे शहरातील वाहन चोरी, जबरी चोरी व घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करुन, चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने हडपसर पोलीस ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी सपोनि हनुमंत गायकवाड व सौरभ माने व पोलीस अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना दिनांक १३/०४/२०२१ रोजी १४:३५ वा. चे सुमारास तपास पथकाचे पोलीस नाईक समीर पांडूळे व पो.शि.प्रशांत टोनपे यांना गोपनीय माहिती मिळाली की हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं २८९/२०२१ भादवि कलम ४५४, ४५७, ३८० ३४ मधील संशयित इसम  सनीसिंग पापासिंग दुधाणी (वय २२ वर्षे रा. गल्ली नं ५ बिराजदार नगर श्री साई सोसायटी समोर हडपसर पुणे) व सोहेल जावेद शेख (वय २१ वर्षे रा. गोसावी वस्ती हनुमान मंदीरासमोर हडपसर पुणे) आणि बाल अपचारी हे बिराजदार नगर कॅनोलजवळ फिरत आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर वरील पोलिसांनी बातमीची शहानिशा करणेकरीता व आरोपींचा शोध घेणेकरीता विराजदार नगर येथील कॅनॉलजवळ गेले असता तेथे संशयित इसम सनीसिंग व त्याचे वरील दोन साथीदार असे त्यांचेकडील लाल रंगाची ऍक्टिव्हा मोटारसायकल वरून जात असताना दिसले. 

त्यांना पोलिसांनी ओळखून तुम्ही थांबा असे म्हणून आवाज दिला असता ते त्यांचेकडील मोटारसायकल वरून पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले.पोलिसांना धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत हडपसर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हडपसर पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, सौरभ माने व पोलीस अंमलदार यांनी  दोन्ही आरोपींना पकडून त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी हडपसर, कोरेगाव पार्क, भोसरी, चाकण, कोंढवा या परिसरामध्ये घरफोडी, वाहनचोरी केल्याची कबुली दिली आहे. 

या आरोपींकडून 04 घरफोड्या, 04 चारचाकी कार, 03 दुचाकी 12 गुन्हे  तपासात उघडकीस आले आहेत.

यावेळी पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी माहिती देताना सनिसिंग पापासिंग दुधानी आणि सोहेल जावेद शेख यांच्याकडून 11 गुन्हे निष्पन्न झालेले आहेत. दोघेही मोक्कातील आरोपी असून, औंध पोलिसांना धमकावून फरार झाले होते. तसेच वाहनचोरी करून त्या वाहनांचा वापर घरफोडीसाठी करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

हि कामगिरी सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजू अडागळे, दिगंबर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षीरसागर, पोलीस नाईक नितीन मुंडे, समीर पांडुळे, अविनाश गोसावी, पोलीस शिपाई अकबर शेख, प्रशांत टोणपे, शाहीद शेख, प्रशांद दुधाळ, निखील पवार, शशिकात नाळे, सचिन जाधव, सैदोबा भोजराव, संदीप राठोड यांच्या पथकाने ही केली आहे.