Categories: Previos News

पाटसमध्ये 2 लाख 12 हजारांच्या दागिन्यांची चोरी



दौंड : सहकारनामा ऑनलाईन


दौंड तालुक्यातील पाटसमध्ये अज्ञात चोरट्याने घराचे कडी, कुलूप तोडून सुमारे 2 लाख 12 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे.

या बाबत आप्पा बाबू बरकडे (वय 35 वर्षे धंदा शेती रा. पाटस, मोटेवाडा ता

दौंड. जि पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यांच्या फिर्यादीनुसार दि.25 /09/2020 रोजी सायंकाळी 07:00 ते 26/09/2020 रोजी सकाळी 06:00 वा चे दरम्यान पाटस गावच्या हद्दीत असणाऱ्या मोटेवाडा येथे फिर्यादी यांचे घरात कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घराचा कडी कोंयडा कशाच्यातरी सह्याने तोडून घरात अनधिकृतपणे प्रवेश करून यातील फिर्यादी यांनी पोत्यात ठेवलेल्या दोन लहान डब्या मधील 2 लाख 12 हजार रुपये किंमतीचे  सोन्या चांदीचे दागिने चोरी करून नेले आहेत.

घटनेची फिर्याद महिला पोलीस हवालदार स्वामी मॅडम यांनी घेतली असून या घटनेचा तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.सई घाडगे हे करीत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

22 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago