Categories: Previos News

फोटो काढणे बेतले जीवावर, वाहून गेलेल्या 2 जणांपैकी 1 मृतदेह सापडला



पुणे : सहकारनामा ऑनलाइन

राज्यात परतीच्या पावसामुळे मोठ्याप्रमाणावर अतिवृष्टी होऊन अनेक नदी, नाल्यांना पूर आला आहे. या पुराचे फोटो काढण्याची हौस काहींच्या जीवावर बेतल्याची घटना पुण्यात घडली आहे.

पुण्यातील भिडे पुलाच्या नदीपात्रात फोटो काढताना पाण्याच्या प्रवाहात दोन तरुण वाहून गेले होते त्यापैकी एका तरुणाचा मृतदेह नाना-नाणी घाटाजवळ सापडला आहे. सापडलेल्या तरुणाचे नाव सौरभ कांबळे (वय 19) असे असून तो ताडीवालाया रोड येथील रहिवासी आहे. 

तर ओंकार तुपधर (वय १८) हा तरुण अजूनही बेपत्ता असून त्याला शोधण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी मोठा पाऊस होऊन नदीला पूर आला होता त्या दिवशी सायंकाळच्या वरील दोघेजण मित्रासह भिडे पुलाजवळ असणाऱ्या नदीपात्रात उतरून फोटो काढत होते. यावेळी त्यांच्यातीक एकजण वाहून जाऊ लागल्याने त्याला वाचविण्यासाठी त्याचा मित्र सौरभ आत गेला परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले आणि त्यातील एकाच मृतदेह आज सापडला आहे.

हि घटना घडल्यानंतर अग्निशमन दल आणि NDRF जवानांनी  या तरुणांचा युध्दपातळीवर शोध सुरु केला. मात्र यात त्यांना काही हाती लागले नाही, आज सकाळच्या सुमारास नाना-नाणी पार्क  जवळील घाटात सौरभ याचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच NDRF  च्या पथकाने त्याचा मृतदेह बाहेर काढून नातेवाईकांना कळवले. वाहून गेलेला दुसरा तरुण ओंकार याचा अजूनही शोध लागला नसून त्याचाही शोध युद्ध पातळीवर सुरू आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

7 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

23 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 दिवस ago